पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विरूध्दच्या या लढ्यात पिंपरी चिंचवडकरांच्या मदतीसाठी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे धावले आहेत. त्यांच्या आमदार निधीतून महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयास ‘सीटी स्कॅन मशीन दिले जाणार आहे. सुमारे १ कोटी ३० लाख रुपये किंमत असलेले सीटी स्कॅन मशीन लवकरच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (YCM हॉस्पिटल) या ठिकाणी बसविण्यात येणर आहे. आमदार अण्णा बनसोडे यांनी याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे दिला आहे.
covid – 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतेक विधान सभा सदस्याला एक कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. या निधीचा वापर शहरातील कोविड ग्रस्त रुग्णांना व इतर रुग्णांना कायम स्वरूपी व्हावा, अशा दूर दृष्टीने आमदार बनसोडे यांनी तातडीची गरज ओळखून या कामासाठी निधी दिला असून तात्कळ मशीन खरेदी करण्याच्या सूचना प्रशानास दिल्या आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्णांची फुप्फुसे किती संक्रमित आहेत याचे अचूक मोजमाप CT स्कॅन मशीनद्वारे करण्यात येते. रुग्णांचा HRCT स्कोर किती आहे, त्याप्रमाणे तज्ञ डॉक्टर रुग्णावर औषध उपचार करतात. कोरोना अर्थात कोविड -19 हा विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसावर आक्रमण करतो व निमोनिया वाढल्याने रुग्णास श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ लागते. पातळी खालावल्यामुळे रुग्ण आत्यावस्त होते. म्हणून रुग्णांचे फुफ्फुस किती संक्रमित आहे याचा अचुक अंदाज CT स्कॅन मशीनच्या HRCT रिपोर्ट द्वारे मिळतो.
सध्या YCM हॉस्पिटलमध्ये खाजगी कंपनीच्या मालकीची CT स्कॅन मशीन कार्यरत असून खाजगी कंपनी रुग्णाकडून CT स्कॅनचा खर्च वसून करीत आहे. आमदार निधीतून CT स्कॅन मशीन मिळाल्यामुळे शहरातील रुग्नांचा खर्च वाचणार आहे. YCM मध्ये CT स्कॅन करणारी कंपनी शहरातील नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या डोक्यातून कुशाग्र बुद्धीने पेरलेले बीज मनपाचे व सामान्य जनतेचे शोषण करीत आहे. याठिकाणी स्कॅनसाठी १२०० ते ५००० रुपये आकारणी करण्यात येते. स्कॅनचा खर्च रुग्णास करावा लागतो.
आमदार बनसोडे यांनी नागरिकांची गरज ओळखून CT स्कॅनच्या गोंडस नावाखाली रुग्णांची होणारी लुट रोखण्यासाठी दिलेलं CT स्कॅन मशीन भविष्यात खूप उपयोगी पडणार असून रुग्णाचे स्कॅन मोफत होणार असल्याने दिलासा मिळणार आहे.
शहरातील जम्बो कोविड रुग्णालय व ऑटो क्लस्टर रुग्णालय ही रुग्णालये फुल्ल असून कोविडग्रस्त नागरिकांना बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या असून मनपाने युद्ध पातळीवर व्हेंटीलेटर्स बेड आणि ऑक्सिजन बेड्स निर्माणकरून रुग्णांची सोय करावी अशी मागणीही आमदार बनसोडे यांनी केली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा असून कोणताही रुग्ण उपचार न मिळाल्याने दगावू नये अशी भावना व्यक्त केली. एकूणच आमदार बनसोडे यांचा, रुग्णांची तातडीची गरज व भविष्याचा अचूक वेध घेऊन आमदार निधीचा वापर करून YCM रुग्णालयात CT स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव कौतुकास्पद आहे.
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, प्रशासन झटून काम करीत आहे. आरोग्य यंत्रणा विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडून नये. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रत्येक नागरिकाने खबरदारी घ्यावी. लक्षणे असल्यास तात्काळ उपचार घ्यावेत. वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो. परंतू नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group