वाकड (Pclive7.com):- पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाकड येथील भुजबळ चौकात मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर कारने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास भुजबळ चौक परिसरात कंटेनर आणि कारची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की, कारने तत्काळ पेट घेतला. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. स्थानिक पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

















Join Our Whatsapp Group