पिंपरी (Pclive7.com):- रंगानुभूति प्रयोगकला महोत्सव याचा विस्तार होत हा महोत्सव आशियाई स्तरावर प्रयोगकलांची ओळख असणारा व्हावा. पुढील वर्षापासून महोत्सवाची व्याप्ती वाढावी असे प्रयत्न करावेत प्रतिपादन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व थिएटर वर्कशॉप कंपनी यांचे वतीने आयोजित पूर्वरंग ते उत्तररंग या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन ग.दि. माडगुळकर नाट्यगृह येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम क्रीडा कला व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित, भारतीय चित्रपट डिव्हिजन चे माजी विभागप्रमुख समर नखाते, प्रभाकर पवार व अमृता ओंबळे आदी उपस्थित होते.
रंगानुभूति हा शहराची ओळख असलेला भारतातील महत्त्वाचा प्रयोगकला महोत्सव व्हावा. आशियाई महोत्सव व्हावा. भारतातील महत्त्वाचा महोत्सव व्हावा. कलाकार हा माणूस घडवण्याचे काम करतो असेही ते म्हणाले

यावेळी समर नखाते म्हणाले, पैस रंगमंचच्या माध्यमातून कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. शहरात चांगल्या कलाकृती घडत आहेत.कलेचा हा पैस असाच विस्तारत जावो.पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यासाठी सहकार्य करीत आहे ही महत्वाची बाब आहे.
यावर्षीचा रंगानुभूति कला सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांनी केलेल्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल यावेळी देण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरात माझ्या कलेचा केलेला सन्मान प्रेरणादायी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. सुत्रसंचलन तेजस्विनी गांधी यांनी तर आभार उपायुक्त अण्णा बोदडे यांनी मानले.


















Join Our Whatsapp Group