पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मधील अजमेरा कॉलनी रोड आणि नेहरुनगर परिसरात अनधिकृत पत्राशेड व बांधकामांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. गुरुवारी (दि. २० नोव्हेंबर) करण्यात आलेल्या या कारवाईत दोन ठिकाणची सुमारे १ हजार ४५० चौरस फुटांची अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त-२ तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘क’ क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत महापालिकेच्या धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक प्रतिका चौरंगे, सौरभ शिरसाठ, इम्रान पठाण आणि दत्तात्रय छडीदार यांनी सहभाग घेतला. तसेच कारवाईसाठी १९ एमएसएफ जवान, ६ मजूर, १ जेसीबी आणि १ क्रेनची मदत घेण्यात आली.
महापालिकेच्या या कारवाईमुळे अजमेरा सोसायटी रोड आणि नेहरुनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group