पिंपरी (Pclive7.com):- चऱ्होली येथील प्राईड वर्ल्ड सिटी मधील लॉंग आईसलँड सोसायटीमध्ये त्या सोसायटीमधील जे सदस्य कोरोनाने बाधित होतील व ज्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे असतील, त्यांना उपचार करण्यासाठी सोसायटीच्या क्लबहाऊसमधेच सोय करण्यासाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. याचे उदघाटन (दि.०९) भोसरी विधानसभेचे आमदार तथा भाजपा पिंपरी चिंचवड शहाराचे जिल्हा अध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर नितीनआप्पा काळजे, चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष श्री.संजीवन सांगळे, सोसायटीचे चेअरमन अतुल्यसिंग राठोड, सोसायटीचे सेक्रेटरी कृष्णा त्रिपाठी तसेच शासकीय पुनःनियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्य सचिव माननीय दिपकजी पाटील साहेब, या सेंटरमध्ये उपचार करणारे डॉक्टर अजित साठे व सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
ह्या लाँग आईसलँड सोसायटीमध्ये सद्या १० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यातील २ बेड ऑक्सिजन युक्त असणार आहेत व इतर ६ बेड हे साधे असणार आहेत. सोसायटीमधील ह्या आयोसोलेशन वॉर्ड मध्ये ऍडमिट होणाऱ्या रुग्णावर उपचार व देखभाल डॉ.अजित साठे करणार आहेत.
ह्या सोसायटीमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये खेळती हवा, टॉयलेट बाथरूमची सोय आहे. तसेच फॅन एसी व इतर सुविधा उपलब्द करून दिलेल्या आहेत. सद्याच्या कोरोनाच्या वाढत्या महामारीत सोसायटीने हे चालू केलेले आयसोलेशन सेंटर सोसायटी धारकांच्यासाठी खूप महत्वाची मदत आहे. सर्व सोसायटीधारक हे सेंटर चालू केल्याबद्दल कमिटीचे आभार व्यक्त करत आहेत.






















Join Our Whatsapp Group