पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क तसेच कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठीची अन्य खबरदारी घेण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. तरीही नागरिक या आदेशाला पायदळी तुडवून बेफिकीरीने वागत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून अशा नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे.
ही बेफिकिरी नागरिकांसह प्रशासनाच्याही अंगलट येणारी आहे. पुढील काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. दुसऱ्या लाटेतच बेजार झाल्यानंतर देखील नागरिक नियम पाळण्याच्या मनस्थितीत नाहीत.
गुरूवारी (दि.१३) पिंपरी चिंचवड पोलिसांनी ३१० नागरिकांवर मास्क न वापरल्या प्रकरणी कारवाई केली.
कारवाई पुढीलप्रमाणे –
एमआयडीसी भोसरी (४७), भोसरी (१२), पिंपरी (१४), चिंचवड (२६), निगडी (२१), आळंदी (२१), चाकण (२६), दिघी (०३), सांगवी (२६), वाकड (०६), हिंजवडी (१४), देहूरोड (१६), तळेगाव दाभाडे (२८), तळेगाव एमआयडीसी (००), चिखली (०९), रावेत चौकी (१५), शिरगाव चौकी (१५), म्हाळुंगे चौकी (११)






















Join Our Whatsapp Group