पिंपरी (Pclive7.com):- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे सह- धर्मदाय आयुक्त सुधीर बुके पुणे विभाग यांनी जिल्ह्यातील धार्मिक संस्थांना कोव्हीडसाठी आर्थिक मदतीने आवाहन केले होते.
यानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने आज (दि.१४) रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
राज्याच्या शहरी व ग्रामीण कोरोना रुगणांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे जिल्ह्यातील धार्मिक संस्थांनी कोव्हिड केंद्र अथवा आर्थिक मदतीचे आवाहन पुणे जिल्हा सह धर्मदाय आयुक्तांनी केले होते. यानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने खारीचा वाटा म्हणून शासनास आर्थिक मदत करण्याचे ठरवले होते.
यानुसार आज विधान भवन पुणे येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सह- धर्मदाय आयुक्त सुधीर बुक्के, जिल्हाधीकारी डॉ. राजेश देशमुख, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार हे उपस्थित होते. यावेळी सह धर्मदाय आयुक्त व विश्वस्त मंडळाच्या हस्ते सदर रकमेचा धनादेश उपमुख्यमंत्री यांकडे देण्यात आला.






















Join Our Whatsapp Group