पिंपरी (Pclive7.com):- ज्या मुलांचे पालक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. अशा मुलांना आकुर्डी येथील डी.वाय.पाटील महाविद्यालय मोफत शिक्षण देणार असल्याची माहिती डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ.नीरज व्यवहारे यांनी दिली.
सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू आहे. एकीकडे टाळेबंदी व आर्थिक चणचण तर दुसरीकडे वैद्यकीय खर्चाचा बोझा यामध्ये सामान्य माणुस भरडतो आहे. अशातच मध्यम वयातील रूग्णाचे निधन झाले तर लहान किंवा तरूण मुले एकाकी पडतात. अशा भयावह परीस्थितीचा विचार करीता सामाजिक बांधिलकी जपत आकुर्डी स्थित डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाने त्यांच्या अधिपत्या खालील कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे जर कोरोनामुळे दुर्देवी निधन झाले तर त्या विद्यार्थ्याचे उर्वरीत शुल्क पुर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधित कार्यालयीन आदेश सुध्दा संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील यांनी पारीत करून ताबडतोब अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्यात.
या निर्णया संदर्भात बोलतांना प्रभारी संकुल संचालक डॉ.निरज व्यवहारे यांनी सांगितले की, डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डी हे नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत असे अनेक निर्णय घेत असते व त्यामागे संस्थेचे उपाध्यक्ष तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रेरणा असते.
सद्य स्थितीत या वर्गवारी मध्ये बसणार्या विद्यार्थ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू असून येत्या आठ दिवसात तसे आदेश महाविद्यालयाला दिले जातील असे डॉ.व्यवहारे यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group