पिंपरी (Pclive7.com):- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या १४ जून रोजी आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या ५३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड मनसेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी मनसे नेते गणेश सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवार दि.१४ जून रोजी सकाळी ०९ वाजता सेक्टर २२, राहुलनगर, निगडी येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
पिंपरी विधानसभेचे विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे यांच्यावतीने रामनगर, चिंचवड येथे सकाळी ११ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड विधानसभेचे निलेश नेटके यांच्या वतीने प्रभाग क्र.२२ काळेवाडी आदर्शनगर मध्ये सूचना फलकाचा अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे वृद्धाश्रमामध्ये दुपारी १२ वाजता फळवाटप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागातर्फे चिंचवड येथील गोशाळामध्ये दुपारी ०१ वाजता ७०० किलो चारा वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सचिव अक्षय नाळे यांच्या वतीने प्रभाग क्र.१७ मध्ये सायंकाळी ६ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे मदर तेरेसा अनाथ आश्रम, काळभोरनगर येथे दुपारी ०१ वाजता धान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन शिंगाडे, विनोद भंडारी, राजू येवते यांच्या वतीने प्रभाग क्र.१६ किवळे, रावेत या ठिकाणी वृक्षारोपण तसेच गरजू लोकांना चादर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे दि.१४ रोजी गुरुद्वारा वृध्दआश्रम आकुर्डी येथे दुपारी १२:३० ते १:०० च्या दरम्यान खाऊ वाटप करण्यात येणार आहे
पर्यावरण संवर्धन सायकल फेरीला मनसे नगरसेवक सचिन चिखले यांनी दिल्या शुभेच्छा!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिघी – पवना धरण – दिघी या पर्यावरण संवर्धन सायकल फेरीला मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सायकलपटू दत्ता घुले यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसेचे प्रमुख पदाधिकारी रुपेश पटेकर, बाळा दानवले, राजू साळवे, हेमंत डांगे, राजू भालेराव, सुशांत साळवी, महिला सेनेच्या सिमा बेलापूरकर आदी उपस्थित होत्या.





















Join Our Whatsapp Group