पिंपरी (Pclive7.com):- युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी युवासेनेकडून आयोजित आदित्य जनसेवा सप्ताहाचा समारोपाच्या सातव्या दिवशी गेली २ वर्ष हातावर पोट असलेले रिक्षावाले काका यांनाही लाॅकडाऊनची झळ सोसावी लागली त्याची दखल घेत दापोडी, फुगेवाडी येथील रिक्षाचालकांना मानुसकी या नात्याने एक हात मदतीचा या उद्देशाने रेशनिंग कीट चे वाटप करण्यात आले.

उपशहर प्रमुख तुषार नवले ह्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्याप्रसंगी उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, समाजसेविका शीलामामी जाधव, उपविभाग प्रमोद गायकवाड, शाखाप्रमुख राहुल जाधव, वैष्णव काटे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विभाग संघटक निलेश हाके व रवी नगरकर ह्यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group