पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक क्षेञात सतत कार्यरत सणारे गणेश पाडुळे यांच्या कार्याची दखल घेवून मातोश्री सामाजिक संस्थेच्या शहराध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाडुळे यांना निवडीचे पञ संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर, प्रहार संघटनेचे नेते संजय गायके, कार्याध्यक्ष गोरख पाटील, विभागप्रमुख प्रदिप दळवी, सेक्रेटरी रविकिरण घटकार यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित मातोश्री सामाजिक संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, नवनाथ जाधव, बाळासाहेब गायकवाड, अंकुश कोळेकर, मारुती म्हस्के, दत्ता गिरी, अमित आहेर, राहूल कदम, सागर तायडे आदी उपस्थित होते.
गणेश पाडुळे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. गणेशजींच्या माध्यमातून मातोश्री सामाजिक संस्थेचे काम आणखी जोमाने सुरु राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.























Join Our Whatsapp Group