पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शाम जगताप यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी शाम जगताप यांच्या कार्याचा आढावा घेतला. शाम जगताप यांनी चिंचवड विधानसभा युवक अध्यक्षपदावर कार्यरत राहून राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या वाढीसाठी कार्यक्षमपणे काम केले. तसेच कोरोना काळामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. या सर्व कार्याची दखल घेऊन शाम जगताप यांची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी युवकचे विशाल काळभोर ,लाला चिंचवडे, संदीप चिंचवडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण शहरात तरूणांची फळी मजबूत करणे आणि पक्ष बांधणी करणे हेच मुख्य ध्येय आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, युवानेते पार्थदादा पवार यांनी जो विश्वास दाखविला आहे, तो नक्कीच सार्थ ठरवेल. युवकांच्या शक्तीच्या जोरावर नक्कीच आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळवून देऊ.
शाम जगताप – कार्याध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस