पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य धनसंपदा या अभियानांतर्गत पुणे जिल्हा निरिक्षक प्रा. कविता संदेश आल्हाट यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबीरात १५५ जणांची तपासणी केली.
लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड यांच्या सहकार्यातून करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अस्थिरोग, कर्करोग, नाक, कान, घसा, डोळे आदींची तपासणी करण्यात आली. तसेच गरजूंना ४० मोफत चष्मे वाटप करण्यात आले. आरोग्य शिबीराचे आयोजन मोशी, चिखली शिव रस्त्यावरील कुमार प्रिन्सेविले या सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन आळंदी डांगे पंच मंडळाचे विणेकरी ह.भ.प माणिक बनकर व इतर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरास भोसरी विधानसभा प्रथम आमदार विलास लांडे पाटील, माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, माजी सभापती विजय लोखंडे, माऊली लांडे, युवा नेते विशाल जाधव, विशाल आहेर, युवा नेते गणेश सस्ते, अशोक ढोकले, प्रकाश गव्हाणे, अरविंद बनकर, युवा नेते प्रकाश आल्हाट, पिंपरी चिंचवड महिला उपाध्यक्ष सपना घाडगे, मेघा पवार, नेहा गारगोटे, प्रदीप आहेर, चिखलीचे माजी सरपंच गणपत आहेर, तुषार जाधव, रामचंद्र बोराटे, भोसरी विधानसभा अध्यक्ष मनीषा गटकळ, कार्याध्यक्ष संगीता आहेर, संगीता जाधव, चिंचवड अध्यक्षा संगीता कोकणे, शहर उपाध्यक्ष उज्वला ढोरे, भारती कदम, सारिका ढमे, भारती कदम, आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
सोसायटीचे अध्यक्ष विजय महाजन व त्यांचे सर्व कर्मचारी तसेच लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर सदानंद गोळे व त्यांची स्टाफ यांचे विशेष सहकार्य लाभले. माजी आमदार विलास लांडे यांनी मनोगत व्यक्त केले व कविता ताईंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व सहकार्याबद्दल लोकमान्य हॉस्पिटलच्या स्टाफचा सन्मान करण्यात आला.





















Join Our Whatsapp Group