पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या उपनगरातून चोरट्यांनी तीन दुचाकी व एक रिक्षा चोरून नेली आहे. गाडीच्या सायलेन्सरची देखील चोरी केली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.७) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनुराग किशोर पवार (वय १९, रा. राजयोग बंगला, प्राधिकरण, निगडी) यांनी आकुर्डी येथील रेम्बो उद्यानासमोर उभी केलेली २० हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी (दि.७) रोजी चोरी झाल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
काळेवाडीतील विजयनगर येथील गोल्डन हॉटेल समोर पार्क केलेली तीस हजारांची पल्सर गाडी (एम एच १४ / डी जी ३३९८) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना २३ जुलै रोजी घडली. विवेक सुखलाल यादव (वय ३२, रा. पाचपिर चौक, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अशोक बालाराम चौधरी (वय ४५, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी ईको गाडीचा ४० हजार रुपये किमतीचा सायलेन्सर चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत. संतोष शाबास कोळेकर (वय ४३, रा. केशवनगर, नेवाळेवस्ती, चिखली) यांनी चार ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पाटीलनगर येथील सचिन कारके यांच्या घरासमोर त्यांनी चाळीस हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच १४/ जी सी ५६८३) पार्क केली होती. पाच ऑगस्ट रोजी सकाळी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी मोकळ्या जागेतून रिक्षा चोरून नेली. चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चाकणच्या झित्राईमळा येथे राजू मलाराम गेहलोत यांची पंचवीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच १४ / एच जे १२९७) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चोरून नेली. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.