पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील एम.जी. देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलीयंट स्टार प्री स्कूलमधे स्वतंत्र भारताचा ७५ वा स्वातंत्र दिन सोहळा उत्साहात पार पडला.
संस्थेचे संस्थापक रामदास देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी संचालिका शांताबाई देवकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवकर, पांडुरंग मिंढे, महाराष्ट्र राज्याच्या पोस्ट विभागाचे रिजनल सेक्रेटरी देवदास देवकर, आदर्श शिक्षक नवनाथ देवकर, अक्षय मिंढे, सरस्वती देवकर व पालकवर्ग उपस्थित होते.
या अमृत महोत्सवी सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना देवकर यांनी केले.