पिंपरी (Pclive7.com):- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके,
नगरसेवक विलास मडीगेरी, केशव घोळवे, बाबू नायर, भाऊसाहेब भोईर, शैलेश मोरे, नगरसदस्या मीनल यादव, अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, शारदा सोनवणे,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, उपआयुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांसह विविध पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
ध्वजारोहण समारंभानंतर महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या माहिती कक्षाचे उदघाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.