पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडगावातील क्रांतीतीर्थ चापेकर वाड्यात देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन, भारत मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भाजपचे संघटन सरचिटणीस, मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नगरसेविका अश्विनी चिंचवडे, संस्थेचे उपाध्यक्षा शकुंतला बंसल, सहकार्यवाह रवींद्र नामदे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, वाडाविभाग प्रमुख मधुसूदन जाधव, शाळा समिती अध्यक्ष अशोक पारखी, नितीन बारणे, वाडा विभाग प्रमुख असाराम कसबे, वाडा विभाग प्रमुख शरद जाधव, अविनाश अगज्ञान, अतुल आडे व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आणि चिंचवड ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
अमोल थोरात म्हणाले, “चिंचवड क्रांतीकारांची भूमी आहे. चापेकरवाडा प्रेरणास्थळ आहे. येथे आल्यानंतर देशभक्तीची प्रेरणा मिळते. चापेकर वाड्यातील ध्वजारोहण करताना अंगावर शहारे आले होते. चापेकरवाड्याच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. यासाठी सहकार्य केले जाईल”.