पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
संभाजीनगर येथील श्री गजानन लोकसेवा बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आले होते. त्यावेळी मारूती भापकर यांनी पवारांना भेटून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची माहिती दिली. त्यामुळे ही महापालिका बरखास्त करा अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली.
त्यावर अजित पवार म्हणाले की, थेट महापालिका बरखास्त करता येणार नाही. तसे केले तर त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते असे ते म्हणाले. सन २०१७ पासूनच्या प्रधानमंत्री आवास योजना, कचरा निविदा, भक्ती-शक्ती उड्डाणपूल, ४२५ रस्ते कामाच्या निविदा, अमृत योजना, स्मार्टसिटीच्या सर्व कामांची उच्चस्तरीय तज्ञ लोकांची समिती नेमून चौकशी करा अशी मागणी भापकर यांनी केली. त्यावर होय मी महापालिकेची उच्चस्तरीय चौकशी लावतो, असे अजित पवार यांनी म्हटल्याचे मारुती भापकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group