पिंपरी (Pclive7.com):- दापोडीत ‘पोलीस बिट मार्शल’ची गस्त वाढवा अशी मागणी युवासेना पिंपरी विधानसभा अधिकारी निलेश हाके यांनी केली आहे.
याबाबत निलेश हाके यांनी भोसरी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दापोडी येथील गणेशनगर भागामध्ये रेल्वे लाईन लगत असलेल्या रोडवर दररोज रात्री व प्रामुख्याने दिवसा मद्यपींचा बिनधास्तपणे वावर असतो.
रात्रीच्या वेळी त्या परिसरामध्ये महिलांची छेडछाड अवैध प्रकार चालतात. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तर अरेरावीची भाषा वापरली जाते. यामुळे सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी सदर भागामध्ये पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या बीट मार्शलच्या फेर्या वाढविण्यात यावेत अशी मागणी निलेश हाके यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group