पिंपरी (Pclive7.com):- एकम् विश्वशांती उत्सव ऑनलाईन ध्यान कार्यक्रम एकम् कडून १७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. जगप्रसिद्ध परिवर्तनकारी (ट्रान्सफॉर्मेशनल) नेते श्री प्रीताजी आणि श्री कृष्णाजी यांचे उत्सवादरम्यान एकम् वरून थेट ५५ मिनिटे शांती ज्ञान आणि ध्यान होणार आहे.
पदार्पणाचे वर्ष २०१८ मध्ये उत्सवात एक दशलक्ष लोक होते. २०१९ मध्ये तीन दशलक्ष लोक सहभागी झाले होते. यावर्षी वीस दशलक्ष लोकांपर्यंत ऑनलाईन पोहोचवणे हा उद्देश आहे. ज्याद्वारे एक शक्तिशाली, आवश्यक शिफ्ट, उत्थान आजच्या काळात निर्माण होईल, असे श्री. प्रीताजी आणि श्री. कृष्णाजी यांनी सांगितले.
हा ऑनलाईन ध्यान कार्यक्रम तीन दिवस दररोज ५५ मिनिटे सुरू असणार आहे. हे ध्यान दररोज एका प्रमुख समस्येवर केंद्रित असेल ज्याच्याशी सध्या विश्व लढत आहे. हे सामूहिक ध्यान आर्थिक अस्वस्थतेला ठीक करण्यासाठी, पृथ्वीग्रहाच्या हिलिंगसाठी असेल.
सर्वांनाच माहीत आहे की, मानवी इतिहासामधील सर्वात मोठ्या महामारीचा सामना आपल्याला करावा लागत आहे. एकम् विश्वशांती महोत्सवाचे उद्दिष्ट व्यक्तिगत चैतन्य परिवर्तनाद्वारे विश्वशांतता प्रस्थापित करणे हे आहे. धर्माच्या पलीकडे संपूर्ण मानवजातीसाठी आहे.
हा विनामूल्य कार्यक्रम जागतिक स्तरावर www.youtube.com/https://pkconsiousness/live. खालील लिंकवर प्रसारित केला जाईल. प्रत्येकाला तीन दिवस किंवा कोणत्याही एका दिवशी सहभागी होता येईल. महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी http://ekam.org/ewpf या खालील लिंकवर क्लिक करा.