पिंपरी (Pclive7.com):- लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पिंपरीगाव येथे मुर्ती विसर्जन व संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व घाटावर मुर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु गणेशभक्तांच्या भावनेचा विचार करत पिंपरी परिसरातील सर्वांसाठी मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी जनसंपर्क कार्यालयसमोरील जागेमध्ये गणेश मुर्ती विसर्जन व संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर केंद्रामध्ये गणरायाची आरती करण्यासाठी २५ X ६० आकाराचा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच ६ मीटर लांबीचे शुद्ध पाण्याचे दोन हौद तयार करण्यात आलेले आहेत. तसेच लोकभावनेचा आदर करित केंद्रामध्ये संकलित व विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमुर्ती हिंजवडी येथे महापालिकेने ठरवुन दिलेल्या खाणीमध्ये वाहतुक करुन विसर्जित केल्या जात आहेत.
आजपर्यंत जवळपास ७०० हून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून पिंपरीगाव व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. शनिवार दिनांक १८ व अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ८ ते राञी १० वाजेपर्यंत नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच विसर्जन केंद्रांवर येताना नागरिकांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील संदीप वाघेरे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group