पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेतील मुख्य अभियंता पदावरील वरिष्ठ अधिकारी प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात ठेकेदाराकडे १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने महापालिका मुख्यालयात कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी प्रमोद ओंबासे यांनी १९ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप संबंधित ठेकेदाराने केला होता. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने महापालिका इमारतीत कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

















Join Our Whatsapp Group