पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड गावातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत १७ दुचाकी आणि ४ चारचाकी अशा एकूण २१ वाहनांचा जळून कोळसा झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, आगीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत इमारतीच्या टेरेसवर १० नागरिक अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका केली.
जवानांच्या प्रयत्नांमुळे संभाव्य जीवितहानी टळली. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असल्याची माहिती आहे. मात्र, आगीत २१ वाहने जळून खाक झाल्याने वाहनमालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून पुढील तपास सुरू आहे.
















Join Our Whatsapp Group