पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेचे सर्व लसीकरण केंद्र साप्ताहिक सुट्टी निमित्त उद्या (रविवार दि.१९) रोजी बंद राहणार आहेत. याबाबतची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, कोविड-१९ या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे दि.१६ जानेवारी २०२१ पासून वय १८ वर्षा पुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर करण्यात येत आहे.
उद्या रविवार दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे रविवार दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी बंद राहतील.