पिंपरी (Pclive7.com):- ताथवडे येथील प्रभाग क्रमांक २५ ताथवडे-पुनावळे-वाकड परिसरातील नागरिकांसाठी फिरत्या गणेश विसर्जन रथाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस गजानन राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सिद्धेश सोनकवडे मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आकाश झेंडे, निलेश चव्हाण, भरत चव्हाण, प्रशांत वापले आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हा फिरता गणेश विसर्जन रथ गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी नवव्या व दहाव्या दिवशी प्रभाग २५ ताथवडे-पुनावळे-वाकड परिसरातील सर्व ठिकाणी जाणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे व प्रदूषण टाळण्यासाठी या विसर्जन हौदांचा वापर करावा, असे आवाहन यावेळी मनसेचे उपविभाग अध्यक्ष सिद्धेश सोनकवडे यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group