पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद यांची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याने ठसा उमवटणारे सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद यांची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबत नियुक्तीचे पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिले आहे.
आकुर्डी भागात तळागाळात आणि घराघरात पोहोचलेला कार्यकर्ता अशी इखलास सय्यद यांची ओळख असून ते राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे मामे बंधू आहेत. गेल्या वीस वर्षांत सामाजिक कार्यात त्यांनी भरीव कामगिरी केली असून भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ध्येय धोरणे, विचार प्रभावी पणे रुजवतील असा विश्वास अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी आपुलकी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.आण्णा कुऱ्हाडे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर ननावरे, श्री संत सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष चौधरी व प्रवीण पवार आदी उपस्थित होते.
पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू असे इखलास सय्यद यांनी यावेळी सांगितले. सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल इखलास सय्यद यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.























Join Our Whatsapp Group