पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव भागातील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक रवि भिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त रवीदादा भिलारे सोशल फाउंडेशन व लोकमान्य होलिस्टिक व कॅन्सर रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर थेरगाव येथे राबवण्यात आले.
या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून स्त्रीरोग, कर्करोग, मधुमेह, बीपी, नेत्र तपासणी अशा अनेक आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर मा. उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक शंकर जगताप, विनायक गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडो युवक युवती तसेच माता बंधू-भगिनींनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
वाढदिवसावर होणारा मोठ्या प्रमाणावरचा वायफळ खर्च टाळून रवी भिलारे यांनी आपल्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा समाज सेवेची भावना दाखवून समाजात एक आदर्श पायंडा घालून दिलेला आहे.






















Join Our Whatsapp Group