पिंपरी (Pclive7.com):- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज सोमवारी मुंबई येथील निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिका-यांनी भेट घेतली. डॉ.कैलास कदम यांनी काँग्रेस शहर अध्यक्ष पदीनिवडीबाबत शाल व पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले व पेढे देऊन आनंद व्यक्त केला.
यावेळी पक्ष संघटनात्मक बांधणी व आगामी कामकाजाबाबत पटोले यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत नाना पटोले यांनी आगामी महानगरपालिका निवडणूकीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. शहरात काँग्रेस संघटना वाढीच्या ठळक बाबी व विशेष तंत्रे समजावून सांगितली. शहरात येऊन बैठक घेण्याबाबतची पदाधिका-यांची विनंती मान्य करत लवकरच शहरात येऊ असा विश्वास त्यांनी दिला.
या प्रसंगी कैलास कदम यांनी आगामी महानगरपालिका निवडणूकीत उत्तम यश मिळविण्याबाबतची तयारी व नियोजन याबाबत पटोले यांना माहीती दिली.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे सदस्य अमित मेश्राम व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे आदि उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group