नवी दिल्ली (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशवासियांना संबोधित करणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
देशात गुरुवारी लसीकरणाचा ऐतिहासिक असा १०० कोटी डोसचा टप्पा पार झाला. त्यानतंर मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावेळी लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची शक्यता, त्यापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेली खबरदारी इत्यादी बाबींवर मोदी बोलण्याची शक्यता आहे.
भारतात २१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत १ अब्जहून अधिक डोस देण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कोरोनाशी पुढच्या टप्प्यातील लढाईबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. देशाजवळ गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठ्या जागतिक साथीचा सामना करण्यासाठी आवश्यक असं एक मजबूत सुरक्षा कवच असल्याचं मोदींनी काल म्हटलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० कोटी डोस झाल्याबद्दल देशवासीय, आरोग्य सेवक, कोरोना योद्ध्यांना शुभेच्छा दिल्या. भारतीय विज्ञान, कार्यक्षमता व १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेचा हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले. आमचे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व हे लक्ष्य साध्य करण्यात आपापले योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

Join Our Whatsapp Group