पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे बारा वर्षांपासून बीआरटी विभागात ठाण मांडून आहेत. ठेकेदाराला अरेरावी करतात. सल्लागाराची बिले रोखतात. भाजपला ‘इलेक्शन फंड’ गोळा करून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे काढली जात आहेत का? इतकी वर्षे झाली तरी सवणे यांची बदली का होत नाही? असा सवाल नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.
महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. बीआरटी विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांनी विविध आक्षेप घेतले.
भाजपचे माऊली थोरात म्हणाले, “कासारवाडी उड्डाणपुलाचा रॅम्प चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला. गेल्या १२ वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्याचा वापर होत नाही. त्याची दोषी अधिका-यावर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी अधिका-याला बढतीचे बक्षीस दिले. हा कुठला आणि कसला कारभार आहे.”
१२ वर्षापासून बीआरटी विभागात ठाण मांडून आहेत. त्यांची बदली का होत नाही. औंध-रावेत रस्त्याच्या डागडुजीच्या कामाची स्मार्ट सिटीतून शंभर कोटींची निविदा काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला विरोध केल्यावर ते थांबले. आता बीआरटी विभागातून साठ कोटींची निविदा काढली. भाजपला इलेक्शन फंड गोळा करून देण्यासाठी कोटी कोटींची कामे काढली जात आहेत का? ठेकेदाराला अरेरावी करतात. सल्लागाराची बिले रोखली जातात. अधिकारीही खुर्चीसाठी भांडतात हे पाहिले.
– राहुल कलाटे, गटनेते शिवसेना






















Join Our Whatsapp Group