पिंपरी (Pclive7.com):- तुळशी विवाहाच्या निमित्ताने सामुहिक तुळशी विवाह सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन सोमनाथदादा तापकीर युवा मंच यांच्या वतीने काळेवाडी येथे पार पडला.
यावेळी परिसरातील अनेक महिलांनी व बचत गटांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला. यामध्ये उपस्थित महिलांनी तुळशी वृंदावन सजावट सुंदर रित्या करून आणल्या होत्या.
यामध्ये सुंदर सजावट करणाऱ्या पाच महिलांना एक साडी, बाळकृष्ण मूर्ती तसेच चांदीची भेटवस्तू सौ. बेबीताई मोहन तापकीर यांच्या शुभ हस्ते देण्यात आली. तसेच सहभागी सर्व महिलांना साडी भेट देण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ काळेवाडी अध्यक्ष पद्माकर जांभळे काका तसेच हभप बाळासाहेब सांगळे महाराज व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी रुपेश तापकीर, अशोक शेळके, अजित धारूरकर, कुणाल शिंदे,अनिल नाथांनी, केतन पडवळ व सर्व मित्र परिवार यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला.