कोरोनामुक्तीसाठी ‘हर घर दस्तक’ योजना नगरसेविका मिनल यादव यांच्या संपर्क कार्यालयात सुरू
पिंपरी (Pclive7.com):- हिंदुह्दयसम्राट सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवसेना शाखा मोहननगर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर दस्तक’ योजनेची सुरुवात नगरसेविका मिनल यादव यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आली.
मोहननगर परिसरातील प्रत्येकजण कोरोनामुक्त होण्यासाठी मिनल यादव यांच्या संपर्क कार्यालयात कोरोना लसीकरण आयोजित करण्यात आले. दरम्यान परिसरातील नागरिकांनी लसीकरणीचा १ व २ रा डोस ( कोविशिल्ड ) घ्यावा असे आवाहन नगरसेविका यादव यांनी केले.
यावेळी शिवसेना संघटक विशाल यादव, विभाग प्रमुख शशिकांत पाडाळे, उपविभाग प्रमुख मधुसूदन अंबुसकर, विभाग प्रमुख सोमनाथ अलंकार, युवा सेनेचे आशिष बाबर, स्वप्निल येवले, नवीन भोसले, संजय पारसकर, रघुनाथ कदम असे अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group