पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाच्या वतीने पद्मश्री डॉ.डी वाय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संत बाबा मोनी साहेब वृद्ध आनंद आश्रमाला साहित्य देवून मदतीचा हात दिला.
यावेळी डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. नीरज व्यवहारे, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या प्राचार्या डॉ. ए. व्ही पाटील, डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य प्रा. धनंजय चौधरी, डॉ. डी वाय पाटील इन्स्टिटयूट ऑफ एमसीए एमबीए च्या संचालिका के. निर्मला, वाय बी पाटील पॉलीटेकनिकचे प्राचार्य प्रा. अरविंद कोंडेकर, डॉ. डी वाय पाटील इन्स्टिटयूट ऑफ एमबीएच्या अधिष्ठाता डॉ.शलाका पारकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट च्या अधिष्ठाता प्रा. जस्मीता कौर, डॉ. डी वाय पाटील जुनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.हावगी बिरादार, उपकुलसचिव वाय के पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी वॉटर बेड, एअर बेड, सॅनिटायझर, सॅनिटायझर स्टॅन्ड आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख तसेच प्रा. धुंडिराज देशपांडे, राजेश पोरे यांनी केले.
संस्थेचे चेअरमन व राज्यमंत्री सतेज डी. पाटील, डी. वाय. प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस एस. पाटील यांनी या उपक्रमासाठी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.























Join Our Whatsapp Group