पिंपरी (Pclive7.com):- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृती दिनानिमित्त गुरूवार दि.१८ नोव्हेंबर रोजी पिंपरी युवासेनेकडून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन मावळ युवासेनेचे विस्तारक राजेशजी पळसकर व पिंपरी चिंचवड युवासेना शहर प्रमुख विश्वजित बारणे ह्यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच नागरिकांना २.५० लाख रुपयांचा अपघाती विमाही देण्यात येणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता पिंपरी युवासेनेचे युवा अधिकारी निलेश हाके ह्यांच्या जनसंपर्क कार्यालय जवळ हा कार्यक्रम होणार आहे.
तरी सर्व युवासैनिक, शिवसैनिक व नागरिकांनी सहभागी होण्याचे आव्हान पिंपरी युवासेनेकडून करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group