पिंपरी (Pclive7.com):- वाल्हेकरवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास भीषण कार अपघात घडला. भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. या दुर्घटनेत बालाजी दीपक गायकवाड (वय २६) या तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाल्हेकरवाडी परिसरातून जात असताना कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून कारमधील जखमींना बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या अपघातात बालाजी गायकवाड यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत अधिक तपास सुरू आहे.


















Join Our Whatsapp Group