पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शहरात आज (दि.०७) दिवसभरात तब्बल १ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सातत्याने वाढणारा कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला आहे. दरम्यान आज दिवसभरात २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आज दिवसभरात १००० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या दररोजच्या मोठ्या रुग्ण वाढीमुळे आज शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ३१३५ इतकी झाली आहे. यातील ३२६ रूग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २८०९ रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
👉🏼 कोरोना अपडेट 👈🏻
शक्रवार, दि.०७ जानेवारी २०२२
पिंपरी चिंचवड महापालिका
Pclive7.com च्या सौजन्याने
➡️ आजची रूग्णसंख्या = १०००
➡️ ओमीक्रॉनचे आज बाधित = ००
➡️ आजपर्यंत एकूण बाधित = २८२३२९
➡️ आज मयत = ००
➡️ आजपर्यंत एकूण मयत = ४५२६
➡️ सध्या सक्रिय रूग्णसंख्या = ३१३५
➡️ आज डिस्चार्ज = २७























Join Our Whatsapp Group