पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे सांगवी, नवी सांगवी परिसरातील एसएससी व एचएचसी (२०२०-२१) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ६० टक्के पुढील गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

राही-माई महिला प्रतिष्ठाण संयुक्त महिला प्रतिष्ठाण तसेच जे.डी ग्रुपच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कोरोना नियमाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता, दोन टप्प्यात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एकूण ४१५ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यात ६० ते ८९ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थी मित्रांना त्याच्या राहत्या घरी भेट देऊन गैरवचिन्ह, प्रमाणपत्र, Bluetooth headphone देऊन गुणगौरव करण्यात आला. तर ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थी मित्राचा गुणगौरव गैरवचिन्ह, प्रमाणपत्र, Bluetooth headphone, पेन देऊन गुणगैरव करण्यात आला.
हा सन्मान सोहळा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संतोष ढोरे, जवाहर ढोरे, अमित पसरणीकर, नामदेव तळपे, कृष्णा भंडलकर, धनंजय ढोर, गणेश काची, शैलेश जाधव, भुषण शिंदे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group