पिंपरी (Pclive7.com):- भोसरीतील डायनोमर्क कंपनीच्या वतीने भारतरत्न सरस्वतीचा अवतार असणाऱ्या, स्वरदेवता, संगीत विश्वातील ध्रुवतारा, कै.लतादीदींना सर्व कामगारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दिवसभर लतादीदींनी मधुर आवाजात गायलेल्या गाण्यांनी कंपनीतील परिसर देशभक्तीनी भावूक झाला होता.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभ्यंकर प्रकाश यांनी लतादीदींच्या जीवनातील संघर्ष व त्यांच्या देशभक्तीचे गीते कामगारांना सांगितले. पृथ्वीतलावर जोपर्यंत सूर्य, चंद्र आहे, तोपर्यंत लतादीदींची नाव अजरामर राहील. आपण ही सर्वांनी त्यांच्या सारखेच कामे करवीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांनी देशासाठी गायलेल्या गाण्यांमुळेच आपल्यात देश प्रेमाची, देशभक्तीची भावना निर्माण होते. आपला देश एका स्वर सम्राज्ञीनीला मुकल्याची याची खंत त्यांनी व्यक्त केली. आणि चांगल्या एका पर्वाचा अंत झाल्याची खंत व्यक्त केली.
गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून लतादीदींनी गायनाला सुरुवात केली. १ हजार हिंदी चित्रपटाबरोबरच तेवढेच मराठी चित्रपटात पण त्यांनी गायले आहे. त्यांची गाणी भारतातील ३६ भाषांत त्यांनी गायले आहे. त्यामधील ये मेरे वतन के लोगो, सागरा प्राण तळमळला, वंदे मातरम्, जयोस्तुते आणि गाता रहे मेरा दिल, मेरी आवाज ही मेरी पहचान है, आज फिर जीनेकी तमन्ना है, आठवण करून दिली कंपनीतील कामगारांना लतादीदींना श्रद्धांजली वाहताना अनेक कामगार भावुक झालेले दिसून आले. याच वेळी जेष्ठ कलाकार रमेश देव यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अभ्यंकर व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड विभाग प्रमुख दिलीप विधाते, प्रिया देशमुख, राजेश वैद्य, हेमंत नेमाडे, प्रवीण बाराते, अमोल पाटे, अक्षरा राऊत, केतकी राऊत, जयंत राऊत, सागर बेलेकर, संजय आरोटे अनेक आस्थापनेतील आधिकारी व कामगार उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group