पिंपरी (Pclive7.com):- लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे उद्या (बुधवार दि.२३) बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोविड १९ या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे वय १५ वर्षा पुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर करण्यात येत आहे.
शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड 19 लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उद्या (बुधवारी दि.२३) लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group