पिंपरी (Pclive7.com):- भोसरीतील अमोलभाऊ डोळस युथ फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त अनाथ आश्रमास फळे व खाऊ वाटप करण्यात आले.

प्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व लांडेवाडी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व संविधान चौक येथील नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आले. शांतीनगर येथील यशवंतराव चव्हाण अनाथ आश्रमास फळे व खाऊ वाटप करण्यात आले.
त्यावेळी युवा नेते अमोलभाऊ डोळस, भगवान जाधव, शशी इंगळे, सतीश गायकवाड, प्रशांत डोळस, सागर डोळस, निखिल ओव्हाळ, सुशांत गायकवाड, रोहन माने, केतन डोळस, शुभम माने, भार्गव डोळस, निखिल जगताप, ऋत्विक डोळस, रितेश लोखंडे, निषाद माने, आर्यन डोळस, प्रशिक डोळस, प्रजोत कडू व युथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group