पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील महिला पोलिसांचा आणि महिला दक्षता कमिटी मधील महिलांचा, सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल टोणपे आणि पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ द. चिंचवडे यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस निरिक्षक सुनील तांबे, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांचे स्वीय सहाय्यक सुनील हिरूरकर, शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, उपाध्यक्ष कमलजित सिंग, सहसचिव रामचंद्र बांगर, मावळ लोकसभा संपर्क प्रमुख स्वरूपाताई खापेकर, पिंपरी चिंचवड शहर युवक उपाध्यक्ष प्रसाद माळगावकर, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विशाल शिंदे, सेक्रेटरी शिवनाथ मांडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रणजित वडणे, उपाध्यक्ष चेतन शिंदे, संघटक राकेश सायकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रसाद कुदळे, उपाध्यक्ष राज सय्यद, पिंपरी विभाग उपाध्यक्ष आलमगिर शेख, चिंचवड विभाग अध्यक्ष वैभव हेंद्रे, कोथरूड विधानसभा आय टी सेलचे अध्यक्ष योगेश खैरे, श्रीनिवास बढे, केशव त्रिभुवन, रामय्या हिरेमठ आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कार्तिक गोवर्धन यांनी केले होते.