पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.२८ रहाटणी येथे राजमाता जिजाऊ अभ्यासिकेचे उद्घाटन माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
आज रहाटणी येथे प्राधिकरण व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या ज्येष्ठासाठी विरंगुळा केंद्र व राजमाता जिजाऊ अभ्यासिकेचे उद्घाटन विठ्ठल उर्फ नाना काटे व राज्य लोकसेवा आणि केंद्रिय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्वीकृत नगरसदस्य सागर खंडूशेठ कोकणे, ‘ड’ क्षेत्रिय कार्यालयाचे प्रभाग अधिकारी विलास देसले, ‘ड’ क्षेत्रिय कार्यालयाचे डेप्युटी इंजिनिअर (स्थापत्य) सुनिलदत्त नरोटे, ज्युनिअर इंजिनियर स्वप्निल शिर्के, विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते.
हि अभ्यासिका पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा तसेच केंद्रिय लोकसेवा आयोग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी विशेष सहकार्य लाभणार आहे. भविष्यातील राज्य व केंद्रातील अधिकारी या अभ्यासिकेतून यशस्वी होतील असा विश्वास नगरसेवक नाना काटे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.