पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी ओपन जीम उभारल्या आहेत. तसेच, उद्यानांमध्येही व्यायाम साहित्य उभारले आहेत. या व्यायाम साहित्याची दुरवस्था झाली असून त्याची डागडुजी करावी, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहरात ८६ व्यायाम शाळा आहेत. अ, ब आणि क या वर्गानुसार व्यायाम शाळांचे धोरण तयार करण्यात आले आहे. याशिवाय महापालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने, मैदान, पदपथ अशा ठिकाणीही ओपन जीम ही संकल्पना राबवली आहे.
मॉर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या ओपन जीमचा लाभ घेतात. महापालिकेच्या क्रीडा विभागामार्पâत आवश्यकतेनुसार विविध ओपन जीमसाठी साहित्य पुरवठा करण्यात येतो. शहरात एकूण ३४ ठिकाणी ओपन जीम उभारण्यात आल्या आहेत. या ओपन जीमसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामाचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे.
सध्या या ओपन जीम आणि उद्यानातील व्यायाम साहित्याची दुरवस्था झाली आहे. जीर्ण, गंजलेल्या साहित्यामुळे किरकोळ दुखापती होत आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले जायंबदी होत आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये याची काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासक आणि महापालिका आयुक्त या नात्याने आपण याची दखल घ्यावी आणि योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.
Tags: उद्यानेओपन जीमपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड महापालिकामच्छिंद्र तापकीरमाजी विरोधी पक्षनेतेसाहित्य दुरूस्ती





















Join Our Whatsapp Group