पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर येथील शाहू जलतरण तलाव त्वरित सुरू करावा अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका मिनल यादव यांनी केली आहे. यादव यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे ही मागणी केली आहे.
मिनल यादव यांनी दिलल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील २-३ वर्षांपासून कोरोनाच्या संक्रमणामुळे मोहननगर येथील जलतरण तलाव बंद आहे. तरी आता कोरोनाचे संकट दूर झाले आहे. तसेच वाढत्या उन्हाळ्यामुळे नागरिकांकडून हा तलाव सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे तलावाची त्वरित डागडुजी करून हा तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात यावा.