पिंपरी (Pclive7.com):- सालाबाद प्रमाणे तिथीनुसार होणारी छञपती शिवाजी महाराज यांची जयंती पिंपरी कॅम्प या ठिकाणी महिलांच्या उपस्थितीमध्ये महाराजांना वंदन करुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवुन शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा केला.

शगुन चौक पिंपरी कँम्प येथे शिवसेना पिंपरी विधानसभा शहरसमन्वयक गणेश आहेर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. चाबुकस्वार यांनी आपल्या मनोगतामध्ये पिंपरी कँम्प परिसरात सतत समाजोपयोगी कार्यक्रम घेणारे गणेश आहेर यांचे मनभरून कौतुक केले. तसेच त्यांच्या कार्याची दखल शिवसेना घेत असल्याचे सांगितले.
यावेळी मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर, विष्णु साळवे, रोमी संधु, खंडु शिरसाठ, अनिल पारचा, बाळासाहेब गायकवाड, मारुती म्हस्के, लहु तिकोणे, संजय यादव, गोरख पाटील, दिपक कांबळे, भरत इंगळे, प्रदिप दळवी, अंकुश कोळेकर, तस्लीम शेख, शुभांगी कदम, दिपक भक्त, धनराजसिंग चौधरी, विशाल वाली, हरेश नखाते, एकनाथ मंजाळ, गणेश वायभट, विशाल बाविस्कर, दत्ता गिरी, सय्यद पटेल, अरुण पाञे, रविकिरण घटकार, अमर कापसे, बाबा जगताप, राकेश नखाते, अमित आहेर, नारायण खुशलाणी, शंकर शिंगारे, राहुल कदम, उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group