पिंपरी (Pclive7.com):- बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर कार्यालयीन सचिव पदी सुरज बाळासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती पक्ष कार्यालय PJ चेंबर पिंपरी पुणे -18 येथे नुकतीच बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर कार्यकर्त्यांची बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी पक्षाची झालेली स्टेट कमिटी मिटिंग संदर्भातील माहिती शहर पातळीवरील कार्यकर्त्यांना देण्यात आली. ह्यावेळी सुरज बाळासाहेब गायकवाड यांची पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर कार्यालयीन सचिवपदी निवड करण्यात आली.
या वेळेस महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेशदादा गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक दादा गायकवाड, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशीलजी गवळी, महासचिव राजेंद्र पवार, सचिव राजेश ढावरे, राहुल शिंदे, श्रावण कोरी, रत्नदिप जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.