पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन समारंभ माजी नगरसेवक विनायक गायकवाड व कॉंग्रेस कमिटी सचिव सचिन साठे यांच्या हस्ते संपन्न झाले.
पिंपळे निलख गावठाण परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार आहे. पिंपळे निलख परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण व्हावे अशी या परिसरातील ज्येष्ठांची व ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी होती. याकरिता परिसरातील ज्येष्ठ नागरिक व कॉंग्रेस कमिटी सचिव सचिन साठे यांनी पुढाकार घेऊन याठिकाणी विरंगुळा केंद्र व्हावे आशी मागणी माजी नगरसेविका ममता विनायक गायकवाड यांच्याकडे केलेली होती. त्या अनुषंगाने पुढाकार घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून मंजूर केले.
पिंपळे निलख येथील या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा भूमिपूजन समारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आला. यावेळी कॉंग्रेस कमिटी सचिव सचिन साठे व माजी नगरसेवक विनायक गायकवाड उपस्थित होते. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले व आभार मानले.