पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयात पिंपरी चिंचवडमधील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी भेट दिली. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लेखी स्वरूपात पाठिंबा दिला आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/04/IMG-20220422-WA0004-300x300.jpg)
राजसाहेब ठाकरे यांचा पाडवा मेळावा तसेच ठाण्यातील उत्तर सभेनंतर राजसाहेब ठाकरे यांच्या भूमिकेने अख्खा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देश खडबडून जागा होऊन एकवटताना दिसत आहे. त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला प्रेरित होऊन पिंपरी-चिंचवड शहरातील विविध हिंदू संघटना प्रामुख्याने विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख पदाधिकारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जिल्हाध्यक्ष शरद इनामदार, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष निधी प्रमुख धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री धनंजय गावडे, जिल्हा सहमंत्री अभिजीत शिंदे, बजरंग दल विभाग सहसंयोजक कुणाल साठे, जिल्हा सहसंयोजक सागर चव्हाण, जिल्हा सहसंयोजक युवराज पाटील, प्रखंड संयोजक संतोष देवकाते, जिल्हा गोरक्षा प्रमुख निलेश चासकर यांनी पाठिंब्याचे पत्र दिले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर प्रभारी गणेश आप्पा सातपुते तसेच पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांना पाठिंब्याचे पत्र दिले. त्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहरसचिव रुपेश पटेकर, शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी, राजू सावळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना उपाध्यक्ष अनिता पांचाळ, भोसरी विधानसभा महिला सेना विभाग अध्यक्ष सुजाता काटे उपस्थित होते.
तसेच अजून देखील पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये उपस्थित राहणार असल्याचे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.