पिंपरी (Pclive7.com):- निगडी प्राधिकरण येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या शिल्पाचे रेंगाळलेले काम त्वरित पूर्ण करून या शिल्पाचे लवकरात लवकर अनावरण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

निगडी प्राधिकरण येथे महापालिकेच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा, महादेवाची पिंड, यासाठी लागणाऱ्या चौथऱ्याचे काम पूर्ण होऊन बरेच दिवस झाले आहे. या चौथऱ्यावर जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा ही बसविण्यात आलेला आहे. समोर महादेवाची पिंड बसवण्यात आलेली आहे. मात्र, महात्मा बसवेश्वर व महादेवाची पिंड प्लास्टिक कागदाने झाकून ठेवण्यात आलेली आहे. त्यासमोर देखणी सूर्यकमान उभारण्यात आली आहे.
या सूर्यकमानीतून महादेवाची पिंड व महात्मा बसवेश्वर यांचे दर्शन नागरिकांना होणार आहे. मात्र, या भागाच्या वॉलकंपाऊंड व शिल्पाच्या मागील पुढील भागाचे सुशोभीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे हे शिल्प जवळजवळ पूर्ण झालेले असतानाही त्याचे अनावरण रेंगाळलेले आहे.
राहिलेली छोटी-मोठी कामे त्वरित पूर्ण करण्यासाठीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून या शिल्पाचे अनावरण ही लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी मारूती भापकर यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group