दलितांवरील अत्याचार रोखा; पदोन्नतीमधील आरक्षणासह विविध मागण्या
पिंपरी (Pclive7.com):- राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखावेत तसेच पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे मंगळवारी (दि.10) पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. सकाळी केलेल्या या आंदोलनात मराठा आणि ओबीसी आरक्षण रद्द होण्यास जबाबदार महाविकास आघाडी सरकारचा रिपाइंच्या वतीने निषेध करण्यात आला. त्यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार गीता गायकवाड यांनी भेट घेत, दलितांवरील अत्याचार रोखण्यास पदोन्नतीमधील आरक्षण व विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

रिपाइं शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला शहराध्यक्षा कोमल कांबळे, प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत, प्रदेश उपाध्यक्ष के.एम. बुक्तर, सचिव सुधाकर वारभुवन, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, युवक आघाडी शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, भारत बनसोडे, देवानंद वाघमारे, सिकंदर सूर्यवंशी, दादा शिरोळे आदी सहभागी झाले होते.

निवेदनात रिपाइंतर्फे करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे-
1) राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी.
2) 2020 पर्यंतच्या झोपड्या शासनाने अधिकृत करून, त्यांचे पुनर्वसन करुन 500 चौरस फुटांचे घर उपलब्ध करून द्यावे.
3) राज्य सरकार ने नोकरी मधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढत मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे
4) भूमिहीनांना कसण्यासाठी 5 एकर जमीन उपलब्ध करून द्यावी.
5)औरंगाबादमध्ये मातंग समाजातील मनोज आढाव यांच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी.
6) उस्मानाबाद जिल्ह्यातील कानेगावमधील अंकुश गायकवाड यांच्या हत्येस जबाबदार आरोपींना व या प्रकरणाची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
7) मागासवर्गी नागरिकांना जातीचा दाखला काढण्यासाठी असलेली 50 वर्षांची अट रद्द करावी.
8) गॅस व इंधन दरवाढ कमी करून सामन्यांना दिलासा द्यावा.





















Join Our Whatsapp Group